'...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' सिनेमा पाहिला. सिनेमा किती उत्तम आहे हे मी काही पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही. पण सिनेमा बघताना मला एका गोष्टीचं वाईट वाटलं ते असं की सोशल मीडिया आणि दूरदर्शनच्या चॅनल्सनी आपण इतके वेढले गेलो आहोत, की त्यामुळे आपल्याकडची कलाकारांविषयीची नाविन्याची भावना थोडी लुप्त झालीये. म्हणजे एखाद्या सुपरस्टारचं आकर्षण कोणाला नसतं, पण चित्रपटाच्या पोस्टरवरचा कलाकार (तेही बहुतेकदा त्या कलाकाराचं पोर्ट्रेट रंगवलेलं, फोटो नव्हेच!) कधीतरीच प्रत्यक्षात बघायला मिळणं, गर्दीतून वाट काढून त्याला सेकंदभरासाठी स्पर्श करता येणं आणि त्यानंतर 'अमुक एका कलाकाराला प्रत्यक्षात बघणाऱ्या काही मोजक्या भाग्यवंतांपैकी आपण एक आहोत' ही निर्माण झालेली कमालीची फिलिंग दुर्दैवाने आमच्या पिढीच्या वाट्याला येणे नाही ! आपण आपल्या आवडत्या कलाकारांना वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, सोशल मीडियावरच्या त्यांच्या पोस्टमध्ये सतत पाहत असतो; इतकंच कशाला 'facebook / instagram live' मधून थेट संवादही साधत असतो. त्यामुळे '#fan moment' ही routine चा भाग झालेली असताना आपण डॉ. काशीनाथ घाणेकरांच्या आजूबाजूच्या गर्दीइतके भाग्यवंत नाही, असं वाटतं. सोशल मीडिया ही आजची गरज आहे, त्यामुळे त्याला दोष देण्याचा अजिबातच उद्देश नाही, फक्त ती 'नवखेपणाची' मजा मिस करत असल्याचं छोटंसं दुःख आहे!
साध्या साध्या गोष्टी एकाच वेळी मनात अनेक विचार पेरून जातात आणि तेव्हा प्रश्न पडतो "काय बाई सांगू ?" काही बहरलेल्या विचारांची हि छोटीशी बाग तुमच्यासमोर आहे...तुमच्या विचारांचं खत घालून माझ्या विचारांना आणखी बहरायला मदत करून ह्या छोट्या बागेचं नंदनवन केलंत तर आनंदच आहे ! :)
Monday, November 12, 2018
Monday, August 27, 2018
संगीत : ये वो बंधन है जो कभी टूट नही सकता...
आत्ता नाशिक-मुंबई प्रवास करत्ये. गाणी ऐकता ऐकता 'स्वदेस'मधलं 'ये जो देस है तेरा' गाणं लागलं. माझं फार आवडतं गाणं. आजपर्यंत कितीतरी वेळा ऐकलं. पण गाण्याची ही जादू आहे. ज्यावेळी आपण गाणं ऐकतो, त्यावेळच्या मनातल्या भावनांप्रमाणे ते ते गाणं आपण अनुभवतो. आज रक्षाबंधन. माझ्या भावांना भेटले नाही. खूप मिस करत्ये त्यांना. सगळ्यांचे आपापल्या भावांबरोबरचे फोटो पाहून तर ही भावना शतपटीने दुणावली. मनात हे सगळं उपर-निचे घडत असतानाच, 'ये जो देस है तेरा, स्वदेस है तेरा, ये जो बंधन है वो कभी टूट नहीं सकता!' हे शब्द ऐकत होते. एक विचार आला मनात. वाटलं, देश आपलं रक्षण करतो, आपण या देशाची काळजी घेतो ? त्याच्यावर प्रेम करतो? किती केलं पाहिजे आपण त्याच्यासाठी?
Saturday, August 4, 2018
संगीत : सहेला रे...
लहानपणी शास्त्रीय संगीत शिकत असताना हळुहळू जेव्हा त्याची व्याप्ती लक्षात येऊ लागली, आपण शास्त्रीय संगीत ऐकलं पाहिजे हे जेव्हा कळू लागलं, तेव्हा एकएका स्वररत्नांची नावं कानावर पडू लागली. त्यातलंच एक नाव गानसरस्वती किशोरीताई आमोणकर. ताईंबद्दल ऐकलं होतं. त्यांचं गाणं अद्वितीय आहे, त्यांनी संगीताबद्दल प्रचंड चिंतन मनन केलं हे सगळं माहिती होत होतं. पण त्यावेळी माझ्या बालबुद्धीकडे त्यांच्या विचारांची व्याप्ती काय असेल याची कल्पना करण्याची शक्ती नव्हती.
Tuesday, July 31, 2018
प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 5
कृतज्ञतेचं ओझं
Thursday, June 21, 2018
प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 4
'शांती'स्तूप
लोकहो, केवळ लडाखलाच नाही, कुठेही गेलात आणि पर्यटक त्या त्या जागेचा रुतबा समजून वागत नसतील, तर आवर्जून त्यांना तसं वागण्यापासून रोखा. लोक निर्लज्ज असतात, "तुम्हे क्या करना है" वगैरे प्रश्नांना कदाचित तुम्हांला सामोरं जावं लागेल, पण शांततेने शक्य होईल तितक्या माणसांना त्या त्या जागेत नियमाने वागण्यास सांगा. तुमचा फिरण्याचा फार वेळ आणि श्रम यात घालवू नका, पण "हमे क्या करना है" म्हणून पुढेही जाऊ नका. आपण इतर वेळी देशासाठी फार काही करू शकत नाही, ही चांगली संधी आहे!
Monday, June 18, 2018
प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 3
Out of coverage area!
Tour सुरू झाल्यापासून ४ दिवसांनी मिळालेल्या पहिल्यावहिल्या wifi च्या पासवर्डचा फोटो आहे हा! 😁
Saturday, June 16, 2018
प्रवास : Ladakh : In Love with Ladakh - 2
'Tso' म्हणजे Lake.
Friday, June 15, 2018
प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 1
Friday, June 1, 2018
Sunday, May 6, 2018
सिनेमा : Cycle
Cycle : The Film
संशोधन (Research)
भक्ती आठवले
स्वत:चं नाव मोठ्या पडद्यावर पाहताना खूप भारी वाटतं! :)
२०१४ मध्ये 'सायकल' या सिनेमासाठी अदितीने गोष्ट लिहिली. तिच्या या गोष्टीसाठी काळानुरूप काय काय गोष्टी सिनेमात दाखवल्या पाहिजेत याची माहिती घेण्यासाठी...म्हणजेच रिसर्च करण्यासाठी भू गाव, राजापूर, आडिवरे, देवगड अशा गावांमध्ये फिरले. अनेक लोकांना भेटले, खूप छान अनुभव घेतले, या कामासाठी अनेकांची मदत झाली. हा सगळा अनुभव अदितीमुळे शक्य झाला. थांकू अदिती !!!
सुरूवातीला या फिल्ममध्ये मुख्य पात्र हे 'पोस्टमन' असणार होतं. पण दरम्यानच्या काळात पोस्ट आणि पोस्टमन संबंधित काही सिनेमे आल्याने या पोस्टमनचा 'ज्योतिषी' केला गेला. हीच गंमत असते लेखकाची. परकाया प्रवेश करून ही माणसं कल्पनाविलासात रमू शकतात. त्यामुळे २०१४ ते २०१८ अशी ख-या अर्थाने 'फुरसत से बनाई हुई' ही फिल्म आहे.
आता थोडं फिल्मबद्दल. अदिती ही चांगुलपणावर विश्वास असणारी लेखिका आहे. 'कॉफी आणि बरंच काही', 'हंपी' आणि आता 'सायकल' या तिच्या आत्तापर्यंतच्या फिल्मस् कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या 'पॉझिटिव्ह'पणावर बेतल्या आहेत. लेखकांच्या कामामध्ये त्यांच्या values, त्यांची मतं रिफ्लेक्ट होत असतात. कारण बाहेरच्या गोष्टी आत झिरपून, त्यावर प्रोसेस होऊन मग त्या कामात नकळतपणे उतरायला वेळ लागतो. पण किमान सुरवातीच्या काही कामांमध्ये तरी लेखकाच्या त्या त्या स्टेजमधलं व्यक्तिमत्व बाहेरच्या गोष्टींच्या अनुशंगाने जास्त सहजपणे आणि नकळत फिल्मद्वारे रिफ्लेक्ट होतं. या फिल्मचंही तसंय. खरी, सोपी गोष्ट आहे ही. आता एखादी फिल्म जन्माला घालायची म्हणजे Box Office ची गणितं जुळू शकतील की नाही याचा विचारही करावाच लागतो. पण संपूर्ण टीमने त्या पलिकडे जाऊन जीव ओतून केलेल्या कामाला लोकांकडूनही शाबासकी मिळतेच!
Friday, April 13, 2018
Tuesday, February 27, 2018
प्रति, मराठी भाषा...
Friday, February 16, 2018
आजी !

Miss you आज्जी! ❤
Thursday, January 25, 2018
माझं कौतुक !
Saturday, January 20, 2018
शब्दपुष्प..
'रागों से बने धून' कार्यक्रम सुरू आहे. अजयजी रागांतून होणा-या गाण्यांच्या जन्माबाबत सांगतायत, थोडं गातायत, बाकी शिष्यांकडून आणि सहगायकांकडून गाऊन घेतायत. अजयजींची गाणं शिकवण्याची पद्धत दुस-यांदा अनुभवण्याचं भाग्य लाभतंय. यांना ऐकताना आजूबाजूचं सगळं एका जागी स्तब्ध झालंय आणि ही व्यक्ती संगीतासाठी प्राण ओतून काम करत्ये, असं वाटतं आणि वाटतं की यांच्यानंतर, यांच्यासारख्यांनंतर काय? हा आजच्या पिढीबाबतचा अविश्वास अजिबात नाही! परंतू 'उत्तम शिक्षक' आणि 'उत्तम गायक' या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीच्या ठायी असणा-या अनेक व्यक्ती निर्माण झाल्या हव्यात असं मनापासून वाटतं, संगीतावर प्रेम करणारे तयार झाले पाहिजेत असं वाटतं. अजयजींसारखी माणसं सगळ्या गायन प्रकारांपलिकडे, सगळ्या घराण्यांपलिकडे गेली आहेत. हिंदी सिनेमांतली गाणी रागांवर कशी आधारलेली आहेत हे सांगताना ते केवळ शास्त्रीय संगीताच्या श्रेष्ठत्वावर भर देत नाहीत, प्रेक्षकांनी ओत:प्रोत भरलेल्या सभागृहात ते 'मेरे नैना सावन भायो' गाणा-या किशोरदांचंही मोठ्या मनाने कौतुक करतात. पण त्याच वेळी शास्राचं महत्त्व सांगायला विसरत नाहीत. त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे नि:स्वार्थी भावाने संगीत सेवेला अर्पण केलेलं पुष्प आहे जणू!
आपल्या मनात रूजलेल्या त्यांच्या शब्दरूपी बीजांचं पुष्पात रूपांतर होण्याच्या प्रतिक्षेत!
