Friday, June 1, 2018

आज की सुबह आपके नाम..!

माझे डेंटिस्ट डॉ. सचिन जयवंत अतिशय रसिक आहेत. अभंगांपासून क्लासिकलपर्यंत सगळ्या संगीतप्रकारांचा डेटा त्यांच्या क्लिनीकमध्ये असतो. मी ब्रेसेस लावल्या होत्या तेव्हा रेग्युलर जाणं व्हायचं त्यांच्याकडे. इयत्ता चौथीत असताना मी दुस-या एका डेंटिस्ट काकांकडून अक्षरश: पळून आले होते. अतिशयोक्ती नाही. 'प.ळू.न.' आले होते. पण जयवंत डॉक्टरांची संगीताविषयी आणि चित्रकलेविषयी आवड आणि त्यातून होणा-या आमच्या गप्पा यांनी माझं दुखणं फारच सुसह्य केलं.
बरेचदा त्यांच्याकडे पं. प्रभाकर जोगांंची 'गाणारं व्हायोलीन' ही सीडी लावलेली असते. Instrumental ऐकताना शब्द आठवून ते मनातल्या मनात गुणगुणण्यात लोक बिझी होतात आणि डॉक्टरांचं काम त्यातल्या त्यात थोडंसं सोपं होत असावं. त्यांच्याकडे इतके वेळा मी 'गाणारं व्हायोलीन'मधली गाणि ऐकलीयेत की आता जेव्हा मी त्यातली गाणी ऐकते, तेव्हा मी माझी बत्तीशी डॉक्टरांच्या हाती सुपूर्त करून पायाने ताल धरून विशालकोनातल्या खुर्चीत बसून root canal करून घेण्यात तल्लीन आहे असा फील येतो! आज की सुबह आपके नाम डॉक्टर! 

No comments:

Post a Comment