रोज एक बुलबुल माझ्या खिडकीतून लांबवर दिसणाऱ्या उंचावरच्या एका वायरवर बसलेला असतो. आकाशात बसून कुजन करत मनमुराद आनंद लुटताना त्याला पाहिलं की मलाच काय आनंद होतो! पहिल्या दिवशी दिसला तेव्हा वाटलं, अरे वा! आज सुंदर योग आहे. पण नंतर लक्षात आलं की रोज संध्याकाळी ५ ते ६ च्या दरम्यान तो तिथे येतोच. मला आपला तेवढा निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा दिलासा पुरेसा आहे आनंदून जाण्यासाठी. रोज मी खिडकीत झाडांच्या शेजारी बसून चहा पिते आणि हा आलाय की नाही पाहते. कधी मी आधी येते, कधी तो. इथे आवाजही अगदी स्पष्ट ऐकू येतो. गंमत वाटते. त्याला माहिती नसेल, रोज कोणीतरी त्याच्या 'असण्याचा' आनंद घेत आहे! आपलंही असंच काहीसं असेल ना?! Each one of us is a gift to the world because each one of us is gifted. मग जे काही या जगात घेऊन आलो, ते या जगाला कृतज्ञतापूर्वक परत देणं आपलं कर्तव्य नाही का ?! सध्या दिवस इतके मलूल आहेत की सगळ्या सुख-सोयी आपल्याकडे आहेत; आपल्याला त्याची जाणीवही आहे. पण आजूबाजूची परिस्थिती तरीही कधीतरी मन खिन्न करते. त्याचा परिणाम म्हणून आपल्या मनात विचार येऊ शकतो, माझं काय महत्त्व ?! माझ्या असण्याने, नसण्याने कोणाला काय फरक पडणार आहे ?! किंवा माझी कोणाला काळजी, इत्यादी. पण असं कसं ? आपल्या नकळत आपण कित्येकांना आनंद देत असूच की ! सध्याचा काळ आणि 'मारवा' राग यांच्यात फार साम्य वाटतं मला. 'मारवा' ऐकला आणि तुमच्या मनावर मळभ दाटून आलं नाही, मनात काहूर माजलं नाही, असं फार क्वचित होतं. झालेलं काहीच नसतं. अगदी सुखवस्तू घरात बसून आपण तो राग ऐकत असतो. पण तो त्या रागाचा स्थायीभाव आहे. तसं, सध्याच्या काळात मनावर मळभ दाटणार आहे, हे धरुनच चालू. प्रहर बदलला की राग बदलतो, तसा काळही बदलेल आणि वातावरण प्रसन्न होईल, यात शंका नाही. तेव्हा कोणी 'यमन' गात ते व्यक्त करत असेल तर कोणी 'देस'चा आनंद घेत असेल. पण तोपर्यंत आपल्याला कुठल्या गोष्टी 'gift' म्हणून मिळाल्या आहेत, त्याचा शोध घेऊ आणि आपल्या ओंजळीत मावेल इतका आनंद आणि सकारात्मकता दुसऱ्याच्या ओंजळीत देण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर अवतीभवती असणाऱ्या लहान-लहान पण मन प्रसन्न करणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊ. प्रत्येक दिवस आनंदात घालवायचा प्रयत्न करू आणि जमल्यास आनंदाचा क्षण अनुभवाला देणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आभार मानू. रोज मी त्या लांबवर असणाऱ्या बुलबुलला मनोमन सांगते, की अरे मी पाणी ठेवलंय खिडकीत तुम्हां पक्षांसाठी ! ते प्यायला ये कधीतरी घरी. कधी आलाच, तर थँक्यू म्हणायचंय मला त्याला. बघू कधी भेट होत्ये ! तोपर्यंत इथूनच त्याला अतिशय मनापासून thank you! He is unaware that he is a gift to somebody; just like us!
साध्या साध्या गोष्टी एकाच वेळी मनात अनेक विचार पेरून जातात आणि तेव्हा प्रश्न पडतो "काय बाई सांगू ?" काही बहरलेल्या विचारांची हि छोटीशी बाग तुमच्यासमोर आहे...तुमच्या विचारांचं खत घालून माझ्या विचारांना आणखी बहरायला मदत करून ह्या छोट्या बागेचं नंदनवन केलंत तर आनंदच आहे ! :)
Thursday, May 6, 2021
इतर : We are a gift to the world!
ता. क. फोटो blurr आहे. Google वर छान फोटोज् मिळाले असते, पण हा तोच बुलबुल आहे, जो मला दिसतो आणि तो special आहे. म्हणून त्याचाच फोटो!
- भक्ती आठवले
०६.०५.२०२१
Thursday, December 31, 2020
Thank you 2020 !
आता ३१ डिसेंबर हा दिवस माझ्यासाठी बहुदा मागे वळून पाहण्याचा, वर्तमानाचे आभार मानण्याचा आणि येत्या वर्षाचं मोकळ्या मनाने स्वागत करण्याचा दिवस झालाय. यावर्षी
२०२० हे वर्ष सगळ्यांसाठीच अत्यंत वेगळं ठरलं असलं तरी भावना कृतज्ञतेचीच आहे. कारण कुठलीच वस्तू, परिस्थिती किंवा माणूस संपूर्णपणे चांगला किंवा वाईट नाही. त्यामुळे घडून गेलेल्या, न बदलता आलेल्या, आपल्या control बाहेरच्या गोष्टींना आठवण्यापेक्षा त्यांनीही जाता जाता आपल्याला काय शिकवलं, हे बघायला काय हरकत आहे ?!
इतकं 'जागतिक सामायिक' वर्ष मी पहिल्यांदाच अनुभवलं आहे. अनिश्चिततेची निश्चितता स्विकारुन माणसाने स्वतःला कसं संयत ठेवावं, हे सांगणारं वर्ष ठरलं. माणसाला परिस्थितीशी जुळवून घेण्याची किती मोठी ताकद निसर्गाने दिलीये ! मग आपण कुरकुर कशाची आणि का करावी ? मान्य आहे, भरल्या पोटी हे बोलणं, लिहिणं फार सोपं आहे. ज्यांच्या पोटाला चिमटा बसला, ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं त्यांच्यासाठी हे वर्ष अत्यंत कठीण गेलं आहे. पण स्वतःला कुठल्याही बाबतीत 'privileged' असल्याची जाणीव झाल्यानंतर कितीतरी जणांनी आपापल्या विचारांप्रमाणे, कुवतीप्रमाणे, संधी मिळेल तिथे, तेव्हा मदत केल्याची संख्याही कमी नाही आणि ज्यांनी स्वतःला याबाबतीत procrastinate केलंय, त्यांनाही देरी किस बात की ?!
आणखी एक गोष्ट, तुमच्यापैकी आणखी कोणाला असं वाटलं का या वर्षात की अरे, आपण निसर्गाची काळजी घेणार नाही, आपणच इतर माणसांची काळजी घेणार नाही, तर कोण आहे या जगात दुसरं आपली काळजी घ्यायला ? म्हणजे आपण आपल्या घरच्यांच्या बाबतीत जशी काळजी करतो ना, तसं काहीसं feeling आलं या जगातल्या सगळ्या माणसांसाठी irrespective of all man-made boundries. MJ जसं म्हणतो, Make it better place, for you and for me and the entire human race! तसं काहीसं. तुम्हांला नाही वाटत आपल्याला; म्हणजे एकूणच माणसाला; एकमेकांशी अजून चांगलं वागायला खूप scope आहे ? हा माझा optimistic approach असावा, patience असावा किंवा pipedream असावं पण उम्मीद पे दुनिया कायम है !
माणूस हा evolving प्राणी आहे आणि सुख-दुःख काहीच permanent नाही. मग आहे ती परिस्थिती स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी अनुcool करून घेण्यावर concentrate करायला काय हरकत आहे ?! स्वतःचं स्वतःला entertain कसं करता येईल, हा विचार करायला आणि प्रत्यक्षात आणायला सुद्धा आपल्याला भरपूर वेळ दिलाय या वर्षाने. Remember all those peaceful moments which allowed us to introspect. Those are precious!
आयुष्य सुंदर आहे पण आपलं आयुष्य सुंदर करण्याची जबाबदारी आपली आहे. Phases, माणसं, वस्तू यांचा additions आणि deletions चा चढ-उतार चालायचाच! त्या त्या वेळेला ते ते स्वीकारून पुढे जात राहण्यात मजा आहे. Let go करण्यात सुकून आहे. प्रत्येक दिवस काही ना काही शिकवणारा आहे. पण ती शिकवण लक्षात घ्यायची जबाबदारी आपली आहे. तेव्हा २०२० च्या ३६६ दिवसांचे मन:पूर्वक आभार.
जाता जाता 'La La Land' या अत्यंत सुंदर सिनेमातलं एक वाक्य आठवलं. Keith - Sebastian ला म्हणते, "How are you going to be a revolutionary if you’re such a traditionalist? You’re holding onto the past, but jazz is about the future." :)
सर्वांना येत्या २०२१ वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! येतं वर्ष आनंदी आणि निरामय जावो!
Wishing you all a very happy and healthy new year!
- भक्ती
३१.१२.२०२०
Monday, July 6, 2020
इतर : गुरु
छायाचित्र सौजन्य : www.tinybuddha.com |
'गुरुपौर्णिमे'च्या दिवशी आपले किती गुरु आहेत आणि किती म्हणून आयुष्यात शिकायचं बाकी आहे हे जरा अधिकच प्रकर्षाने मनात अधोरेखित होतं. 'ज्ञानापुढे' आपण खूप लहान असल्याचं जाणवतं. आज सहजच 'गुरु' ही संकल्पना माझ्या मनात कशी घडत गेली याविषयी थोडा विचार केला. त्याविषयी...
.
सुविचार १ : 'माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो'
शाळेत फळ्यावर सगळ्यात वरती सुवाच्च्य अक्षरात रंगीत खडूने रोज एक नवीन सुविचार लिहिलेला असायचा. आता विचार करताना आठवतंय की अक्षर सुवाच्च्य असो किंवा नसो, हे सुविचार नेहमीच माझं लक्ष वेधून घ्यायचे. पण तो सुविचार वाचायचा आणि स्वतःच्या मनाला समजवायचं की 'माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो हं !' यापुढे काही त्या शालेय जीवनातल्या विचारांची उडी जायची नाही. आता वयाचं तिसरं दशक almost संपत आलेलं असताना, आपलं कुटुंब, आपले मित्र-मैत्रिणी, आपले छंद, आपलं शहर, देश यांच्या परे कवेत मावणार नाही इतकं ज्ञान आजमवायचं राहिलंय अजून हे प्रत्येक गाणं ऐकताना, पुस्तक वाचताना, फिल्म पाहताना, नवनव्या लोकांना, जागांना भेटी देताना लक्षात येतं, तेव्हा पटतं की ही 'विद्यार्थीदशा' never ending आहे आणि ती आनंददायक आहे !
.
सुविचार २ : Reading between the lines is very important!
पुन्हा एकदा शाळेचा reference देते. अगदी पहिली ते तिसरीचा. तीन विषय असायचे - भाषा, गणित आणि विज्ञान. गणित आणि विज्ञानापुढे मी कायमच आदरपूर्वक शरणागती पत्करली आहे ती आजतागायत. त्यामुळे मी त्यांना 'buddies' zone मध्ये कधी येऊच दिलं नाही आणि 'भाषा' मात्र पहिल्यापासूनच bff ! त्यातही नुसते धडे वाचून नाही, पण त्या धड्यांवर कधीतरी माझी मैत्रिणींशी किंवा स्वतःशी नकळत चर्चा झाली की धडा खऱ्या अर्थाने 'शिकल्याचं' समाधान मिळायचं ! तेव्हा चर्चेसाठी conscious efforts घेता येऊ शकतात हे मला कळलं असल्याचं स्मरत नाही ! Organically घडतील तेवढ्याच चर्चा व्हायच्या ! 'वाचणं' - 'शिकणं' आणि 'शिक्षक' - 'गुरु' यात फरक आहे हे नंतर उमगलेलं ज्ञान !
.
सुविचार ३ : प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं !
हळुहळू कळत गेलं की शिकण्यासाठी प्रत्यक्ष गुरु समोर असायला हवा असं नाही. समोर असण्यासाठी प्रत्येक गुरु मूर्त रूपात असेलच असंही नाही. प्रत्येक गुरु आपल्यापेक्षा वयाने मोठाच असेल असंही नाही. त्या व्यक्तीला/गोष्टीला आपण त्याला/तिला गुरु मानलंय हे माहिती असेल असंही नाही आणि अमुक एका व्यक्तीकडून/गोष्टीतून/घटनेतून/परिस्थितीतून आपण काहीतरी शिकल्याचं आपल्या प्रत्येक वेळी लक्षात येईल असंही नाही. या सगळ्या माझ्या 'गुरु'विषयी संकल्पनांतून 'Heal the world' म्हणणारा Micheal Jackson ही माझा गुरु होतो. संगीताविषयी सहजतेने बोलणारे अजय चक्रवर्तीही माझे गुरु होतात. एखादं विचार करायला लावणारं आणि त्यातून एखादा विचार मनात रुजवून जाणारं पेंटिंगसुद्धा गुरुस्थानी असू शकतं. निर्व्याज गोष्टी आपल्याला देणारा 'निसर्ग' तर all-time favourite गुरु आहेच आणि इतकंच कशाला, जिथे धड बसायला बाकही नाहीत, अशा शाळेत जेव्हा मी भेट द्यायला जाते, तेव्हा एखादं तिसरी-चौथीतलं मूलही एखादं असं वाक्य बोलून जातं की त्या निरागसतेतूनही बरंच काही शिकता येतं !
.
सुविचार ४ : अहं ब्रह्माsस्मि।
बऱ्याच लोकांना वाटतं की हे वाक्य हे over confidence चं लक्षण आहे किंवा 'स्वतःला काय समजते / समजतो' ही त्यावरची default रिऍक्शन असू शकते किंवा काही लोक त्याला हिंदुत्ववादाचा किंवा धार्मिक touch वगैरे सुद्धा देऊ शकतात किंवा मग स्वतःला किती संस्कृत येतं हे दाखवायचंय, असा एक उथळ विचार सुद्धा यामागे असू शकतो. असो. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना l माझ्यासाठी हे वाक्य self-confidence देणारं वाक्य आहे.
रुईया कॉलेजमध्ये शिकत असताना संस्कृत विषय होता अभ्यासाला पाचही वर्ष. त्यातल्या कुठल्या वर्षी या वाक्याशी ओळख झाली ते नेमकं आठवत नाही. पण ओळख झाल्यापासून या वाक्याने हाच आशय माझ्यापुढे कायम अधोरेखित केला. शब्दश: बघायला गेलं तर या वाक्याचा अर्थ होतो, 'मी ब्रह्म आहे'. आता यापैकी 'ब्रह्म' हा शब्द ते वर सगळे म्हटलं ते अर्थ उपस्थित करतो. पण मला असं वाटतं 'ब्रह्म' म्हणजे 'जग' किंवा 'आयुष्य'. प्रत्येकाचं ब्रह्म वेगळं. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं. आणि प्रत्येकाच्या आयुष्याचा आणि जगाचा कर्ता पण वेगळा. ती व्यक्ती स्वतः. आपण बाहेरच्या जगाकडे उघड्या डोळ्यांनी खूपदा बघतो. पण आपल्या आतल्या space ला तितका वेळ देत नाही, महत्त्व देत नाही. आपल्याकडची बुद्धी, विचारशक्ती, समज वेगवेगळ्या प्रमाणात माणसाला मिळालेली असते. पण इतक्या वर्षांच्या काळात बाहेरून आलेली माहिती आपण आपल्या आत प्रयत्नपूर्वक process करतो, cultivate करतो. त्यामुळे या आपल्या आत असलेल्या शक्तीला-जाणिवेलासुद्धा आजच्या दिवशी योग्य ते महत्त्व दिलं गेलं पाहिजे, तिचं योग्य तितकं कौतुक केलं गेलं पाहिजे, असं मला वाटतं.
.
बाह्यजगातून अंतरंगात ज्ञान पोहोचवणाऱ्या प्रत्येक घटकाला आणि जाणिवेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी कृतज्ञतापूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार.
Wednesday, June 3, 2020
इतर : Sorry!
कोरोना, चक्रीवादळ हे सगळं वाईट चाललंय, अस्वस्थ करतंय. पण आज जास्त अस्वस्थ केलं आहे ते केरळच्या हत्तीणीच्या बातमीने. कारण कोरोना, चक्रीवादळ ही सगळी कुठे ना कुठे आपल्या कर्माची मिळालेली फळं आहेत. पण त्या बिचाऱ्या हत्तीणीचा आणि पूर्ण वाढही न झालेल्या त्या पिल्लाचा काय दोष होता ? भारतात सगळ्यात जास्त 'literacy rate' असलेल्या राज्यात झालेल्या या घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय की शिक्षित लोकांच्या मनावर माणुसकीचा शिडकावा झालेला असेलच याची खात्री नाही. भारतीय संस्कृतीत गणपतीचं स्थान फार मानाचं आहे. अशा राज्यात अशी घटना घडावी याहून दुर्दैव ते काय ? कितीही अंगारे-धुपारे करा, नवस बोला, मंत्रोच्चार करा, अभिषेक करा, सोन्याने मढवा देवांना. काय उपयोग मनातल्या दगडाला माणुसकीचा पाझर फुटत नसेल तर ?? माणसाची लायकी नाही राहिली माणूस म्हणवून घ्यायची. माणूस कसा इतका भावनाशून्य होऊ शकतो ? मला नेहमीच वाटत आलंय की माणसाला थोडी बुद्धी जास्त मिळालीये. फुलं, झाडं, पानं, पक्षी, कीटक, प्राणी यांना आपण खूप ग्रांटेड घेतो. कुठलंही पान, फुल, झाड मनात येईल तेव्हा तोडतो, त्यांचे फोटो काढतो. पक्षी, कीटक, प्राणी यांना मारतो. पशु-पक्ष्यांना आपला 'शौक' म्हणून, चार इतर दगडी मनांच्या लोकांमध्ये 'awww आमचं मन कसं sensitive आहे' असा बढेजाव मिरवण्यासाठी आपल्या चॉईसप्रमाणे त्यांच्या जन्मदात्यांपासून वेगळं करतो. का ? केवळ त्यांच्या इतक्या नाजूक भावना ते आपल्यासारखं शब्दांद्वारे व्यक्त करू शकत नाहीत म्हणून ? असा विचार करून माणूस जर एखाद्या प्राण्यावर कुठल्याही पद्धतीने अधिकार गाजवत असेल तर त्या माणसांनी लक्षात घ्यावं कि हे प्राणी स्वतःला व्यक्त करण्यात कमी पडत नाहीयेत तर आपण अपयशी ठरलोय. कारण त्यांच्या निःशब्द भावना समजून समजून घेण्याइतका आपला so called 'emotional quotient' develop झालेला नाही. इतक्या जीवघेण्या त्रासातून जात असताना जेव्हा एक गरोदर हत्तीण कोणाही मानवरूपी पशूचं कुठल्याही प्रकारचं नुकसान न करता, ३ दिवस कळा सोसून नदीत जाऊन आपला प्राणत्याग करायचं ठरवते, तेव्हा ती जिंकलेली असते, माणूस नाही. ही बातमी वाचून जर आपण अस्वस्थ झालो नसू, तर आपण मेलोय असं जाहीर करायला हरकत नाहीये. Sorry! तुझी आणि तुझ्या बाळाची मनापासून माफी मागते.
सिनेमा : Parasite (2019) - The South Korean Film
Parasite (2019) : A film by Bong Joon Ho |
सध्या आपण घरांमध्ये अडकून राहिलो असलो तरी वेगवेगळ्या जगात डोकावून पाहिलं जातंय ते फिल्म्सद्वारे. फिल्मच्या शेवटी हाती फक्त झगमगाट आणि चार सुंदर मुलं आणि मुली पाहून झाले हा विचार देणाऱ्या फिल्म्सपासून ते एखादा विचार नकळतपणे मनावर कोरून जाणाऱ्या फिल्म्सपर्यंत किंवा 'The Blue Umbrella' सारख्या लहान मुलांच्या फिल्मपासून गुप्तहेर खात्याच्या रंजक कथा समोर आणणाऱ्या फिल्म्सपर्यंत सगळं पाहत्ये सध्या. परवा कुठली फिल्म पाहूया म्हणून surfing करत होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या कंफर्ट झोनच्या बाहेर जाता येतंय का बघूया म्हटलं आणि 'Parasite' ही ब्लॅक कॉमेडी थ्रिलर फिल्म बघायचं ठरवलं. गेल्यावर्षी Cannes Film Festival मध्ये या फिल्मचा प्रीमियर झाला आणि ही या फेस्टिवलमधली पहिली साऊथ कोरियन अवॉर्ड विनिंग फिल्म ठरली. कोरियन भाषा ही अगदीच वेगळी असल्याने इंग्लिश सबटायटल्सचा आधार घेण्यावाचून पर्याय नव्हता. सिनेमाचं कथानक तसं खूप छोटं आणि साधं आहे. पण फिल्म पूर्ण झाल्यानंतर मनात आलेला पहिला विचार हा होता की सगळीकडची माणसं सारखीच असतात. हातात 'सत्ता' असण्याचं माणसाला प्रचंड आकर्षण आहे. कुणासाठी 'सत्ता' हा शब्द फक्त आर्थिक गणितांपुरता मर्यादित असतो तर कुणाला एखाद्या गोष्टीवर, ठिकाणावर, माणसांवर आपलं वर्चस्व निर्माण करून सत्ताधारी असल्याचा आनंद मिळतो.या सिनेमात सब-वे खाली राहणाऱ्या एका गरीब चौकोनी कुटुंबाची गोष्ट आहे. योगायोगाने या कुटुंबातल्या मुलाला एका श्रीमंत घरातल्या तरुण मुलीला इंग्रजी शिकवायची संधी मिळते. त्यानंतर एक-एक करत या गरीब कुटुंबातली चारही माणसं या श्रीमंत कुटुंबात वेगवेगळ्या कामांद्वारे प्रवेश मिळवतात आणि मग पुढे ही फिल्म अतिशय अनपेक्षित वळण घेते. 'मर्यादेयं विराजते' किंवा 'अति तिथे माती' अशा म्हणी फक्त आपल्या संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या नसून त्या मानवी विचारांच्या आणि परिस्थितीच्या घर्षणातून जन्माला येऊन त्या त्या संस्कृतीचा वेश परिधान करून जगभर वावरत आहेत, असं वाटतं आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात इच्छेची जागा हावेने घेतली कि त्याचा अंत हा विनाशकारीच होतो हे पटतं. असे चांगले सिनेमे घरात राहूनसुद्धा आपल्या मनातल्या बंद असलेल्या विचारांच्या खिडक्यांवर ठोठावतात आणि आपलाच आपल्याशी संवाद सुरु करतात. जागरूक करतात. प्रगल्भ करतात.. आणि हे सगळं होतं कारण Lockdown बाहेर आहे, आत नाही !
Friday, May 15, 2020
Lockdown v/s Quarantine 2020
'Lockdown' ही निरोगी माणसांनी रोग झालेल्या माणसांच्या संपर्कात येऊ नये म्हणून तयार केलेली परिस्थिती आहे आणि 'Quarantine' म्हणजे एखादा रोग 'झालेल्या' माणसाला इतर निरोगी लोकांपासून वेगळं ठेवणे.
फरक आहे अर्थाच्या शेडमध्ये. त्यामुळे निरोगी व्यक्तींनी आपापल्या घरी वेळ घालवण्यासाठी निवडलेले मार्ग जगाला दाखवत असताना सर्रास #quarantinediaries वगैरे हॅशटॅग वापरणं is not cool ! Slowdown होऊया. जवाबदरीने वागूया. थोडं अधिक sensitive होऊया आपल्या कृतींबाबतीत. सगळ्याच बाबतीत. हीच ती वेळ आहे आणि आपल्यात ठरवून काही चांगले बदल करण्यासाठी सध्या वेळही आहे.
Lockdown च्या काळात आपण केलेली प्रत्येक गोष्ट जगाला दाखवता आलीच पाहिजे आणि दाखवलीच पाहिजे असं नाहीये! या अशा काही फोटो टाकून दाखवता न येणाऱ्या गोष्टी जगात व्हायची गरज जास्त आहे येणाऱ्या पुढच्या काळात !
Thursday, April 30, 2020
सिनेमा : Irrfan
Films पाहण्या आणि त्यातून शिकण्याव्यतिरिक्त bollywood हे मला माझ्या आयुष्यापासून खूप लांब असल्यासारखं वाटतं. I don't remember when I last cried for any bollywood actor or actress. Not that I was heartless or disrespectful. Somehow didn't feel the connect. But today I am disturbed since morning. I cried. Felt grateful for what he has given us. Felt hearbroken for not being able to watch his films in the future.
I didn't realize when I started admiring him unknowingly and when I developed so much respect towards him. How I am posting something like this ?! I am surprised myself. But I think this is the power real actor possesses.
An actor whose art left us spellbound not only while watching his movies but also when he left us for the heavenly abode.
Huge loss of Indian Cinema.
Respect Mr. Irrfan Khan.
May your soul rest in peace.
Subscribe to:
Posts (Atom)