Wednesday, June 3, 2020

इतर : Sorry!


    कोरोना, चक्रीवादळ हे सगळं वाईट चाललंय, अस्वस्थ करतंय. पण आज जास्त अस्वस्थ केलं आहे ते केरळच्या हत्तीणीच्या बातमीने. कारण कोरोना, चक्रीवादळ ही सगळी कुठे ना कुठे आपल्या कर्माची मिळालेली फळं आहेत. पण त्या बिचाऱ्या हत्तीणीचा आणि पूर्ण वाढही न झालेल्या त्या पिल्लाचा काय दोष होता ? भारतात सगळ्यात जास्त 'literacy rate' असलेल्या राज्यात झालेल्या या घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय की शिक्षित लोकांच्या मनावर माणुसकीचा शिडकावा झालेला असेलच याची खात्री नाही. भारतीय संस्कृतीत गणपतीचं स्थान फार मानाचं आहे. अशा राज्यात अशी घटना घडावी याहून दुर्दैव ते काय ? कितीही अंगारे-धुपारे करा, नवस बोला, मंत्रोच्चार करा, अभिषेक करा, सोन्याने मढवा देवांना. काय उपयोग मनातल्या दगडाला माणुसकीचा पाझर फुटत नसेल तर ?? माणसाची लायकी नाही राहिली माणूस म्हणवून घ्यायची. माणूस कसा इतका भावनाशून्य होऊ शकतो ? मला नेहमीच वाटत आलंय की माणसाला थोडी बुद्धी जास्त मिळालीये. फुलं, झाडं, पानं, पक्षी, कीटक, प्राणी यांना आपण खूप ग्रांटेड घेतो. कुठलंही पान, फुल, झाड मनात येईल तेव्हा तोडतो, त्यांचे फोटो काढतो. पक्षी, कीटक, प्राणी यांना मारतो. पशु-पक्ष्यांना आपला 'शौक' म्हणून, चार इतर दगडी मनांच्या लोकांमध्ये 'awww आमचं मन कसं sensitive आहे' असा बढेजाव मिरवण्यासाठी आपल्या चॉईसप्रमाणे त्यांच्या जन्मदात्यांपासून वेगळं करतो. का ? केवळ त्यांच्या इतक्या नाजूक भावना ते आपल्यासारखं शब्दांद्वारे व्यक्त करू शकत नाहीत म्हणून ? असा विचार करून माणूस जर एखाद्या प्राण्यावर कुठल्याही पद्धतीने अधिकार गाजवत असेल तर त्या माणसांनी लक्षात घ्यावं कि हे प्राणी स्वतःला व्यक्त करण्यात कमी पडत नाहीयेत तर आपण अपयशी ठरलोय. कारण त्यांच्या निःशब्द भावना समजून समजून घेण्याइतका आपला so called 'emotional quotient' develop झालेला नाही. इतक्या जीवघेण्या त्रासातून जात असताना जेव्हा एक गरोदर हत्तीण कोणाही मानवरूपी पशूचं कुठल्याही प्रकारचं नुकसान न करता, ३ दिवस कळा सोसून नदीत जाऊन आपला प्राणत्याग करायचं ठरवते, तेव्हा ती जिंकलेली असते, माणूस नाही. ही बातमी वाचून जर आपण अस्वस्थ झालो नसू, तर आपण मेलोय असं जाहीर करायला हरकत नाहीये. Sorry! तुझी आणि तुझ्या बाळाची मनापासून माफी मागते.

No comments:

Post a Comment