राम का गुणगान करिये,
राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिये
राम का गुणगान करिये॥
राम के गुण गुणचिरंतन,
राम गुण सुमिरन रतन धन,
मनुजता को कर विभूषित,
मनुज को धनवान करिये, ध्यान धरिये॥
राम का गुणगान करिये,
राम का गुणगान करिये॥
सगुण ब्रह्म स्वरुप सुन्दर,
सुजन रंजन रूप सुखकर।
राम आत्माराम,आत्माराम का सम्मान करिये,
ध्यान धरिये,राम का गुणगान करिये॥
कित्येकदा हे गाणं ऐकलं आहे. पण इतके दिवस रामाकडे एका देवत्वाच्या दृष्टिने बघत होते. आज वाटलं की राम दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या सर्वांमध्ये त्याचा अंश आहे. गरज आहे ते प्रत्येकातल्या रामगुणांची ओळख करून घेण्याची. दुस-याठायी असलेल्या रामगुणांचा आदर करून त्याप्रमाणे वर्तन करण्याची. 'राम - आत्मा, आत्माराम का सम्मान करिये' असंही असेल ते कदाचित! जगातल्या चांगूलपणावर माझा प्रचंड विश्वास आहे. आजुबाजूला अनेक दुष्कृत्य घडताना दिसत असली तरी सरसकट 'जगात काही राम उरला नाही' हे लेबल लावायला तयार होत नाही मी. रामराज्य येईल याची आशा कायम आहे! कदाचित इतक्यात नाही, माझ्या उभ्या जन्मात नाही; पण भविष्यात कधीतरी सही!
गाणं ऐकताना आणि हे लिहिताना डोळे नेमके कशासाठी पाणावलेत कळत नाहीये! पण अनुभव छान आहे!
No comments:
Post a Comment