Wednesday, October 5, 2011

Newspaper आणि चहा !

       सकाळचा चहा हातात पडायच्या आधी दाराला लावलेला newspaper हातात 'पाडून घेणे' हि माझी "आवडती सवय". बरेचदा पेपर आला की लगेच त्याच्या वाचनासाठी त्यातल्या पुरवण्यांच्या आपापल्या आवडीप्रमाणे निवडी होत असत. पण हल्ली फार दिवसांत असा योग जुळूनच आला नव्हता ! कारण संपादक पेपर छपाई साठी वेळेशी बांधील असले तरी आमचा पेपरवाला नाही ना ! कोण जाणे , कदाचित माझी आणि त्याची "आवडती सवय " सारखीच असावी !...होतं काय, की आल्या आल्या लगेच पेपर वाचला की आपण जगातल्या घडामोडींबाबत इतरांच्या आधी किती updated आहोत ह्याचं समाधान मिळतं (निदान घरातल्या उरलेल्या ३ डोक्यांच्या आधी).

     
       असो....तर सांगायचा मुद्दा असा , की आज कधी नव्हे तो  चहा आणि पेपर हे दोन्ही एकाच वेळी माझ्या हातात पडलं.काल रात्री २.३०-३ वाजेपर्यंत घडलेल्या घटनांबाबत आपण कसे 'सर्वज्ञानी' आहोत याचा feel यायला  हळुहळू  सुरवात झाली. चहाचा पहिला भुरका आणि पेपरची घडी व्यवस्थित उघडून तो वाचण्यासाठी मी एकदम सज्ज झाले.पाहिलं पान अपेक्षेप्रमाणेच "आमच्या software मध्ये इतकेsssss रंग आहेत आणि आम्हांला 'हिरवा हा हिरवा म्हणूनच' छापता येतो' हे जणू बजावून सांगत होतं.

      दुसरं पान होतं नाटकं, सिनेमा, वाद्यवृंद यांच्या updates देणारं. हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. प्रचंड जाहिराती पाहून मनाचा 'सांस्कृतिक कोपरा' सुखावला आणि त्यानंतर कुठे खऱ्या अर्थाने front page चं दर्शन झालं. पहिलीच बातमी कोणीतरी कोणाविरुद्धतरी चालू केल्या जाणार असलेल्या मोहिमेबाबतची... झालं...आधीच 'राजकारण' हा नावडीचा विषय. त्यामुळे मनाचा 'राजकीय कोपरा' म्हणाला, "जाउंदे गं, आमचं हे असंच असतं ! पुढे वाच तू". वाचन सुरु- आंदोलनं... आव्हानं...भाड्यात वाढ...कोकेन घेतल्याचा आरोप निश्चित...जिवंत काडतुसांचा साठा सापडला... ह्यांनी त्यांना डिवचले...नवा वाद...स्फोटात ७० ठार... बालमजूर उत्पादकांमध्ये भारताची आघाडी...धमकी...वरिष्ठांचे दुर्लक्ष... अधिकाऱ्याला लाच प्रकरणी अटक...


      अशा बातम्या वाचत वाचत पुढे जात असताना लक्षात आलं, की २२ पानांच्या पेपराची २ च पानं राहिली वाचायची - क्रीडाविषयक पुन्हा एकदा मनाच्या "playing ground"ने हुश्श केलंआणि पेपर संपला ! तेवढ्यात आई आली - "बघूदे गं पेपर मला ! आज काय विशेष ?" "विशेष ???" - मलाच प्रश्न पडला. काही सांगताच येईना. साधारण ३५ '-ve sense' च्या बाताम्यांमागे ६ '+ve' बातम्या असा ratio  होता (जाहिराती , अग्रलेख , daily informative columns , खेळ , नाटक हे सोडून)...खूप down feeling आलं...तेवढ्यात आई ओरडली - "अग्गंssss चहा हा 'गरम' म्हणून  पिण्यासाठी असतो !" त्याबरोबर मी तो 'थंड चहा' एका घोटात पोटात ढकलला...फक्त तहान भागल्यासारखं वाटलं...पण समाधान झालं नाही....तसंच काहीसं पेपराच्या बाबतीतही ! 

9 comments:

  1. छान सुरुवात झाली आहे भक्त्या! आणि किती खरं आहे...चहासारख्या बातम्याही थंड होतात. तो प्यायची आणि त्या वाचायची सवय आहे म्हणून समाधान...दुसरं काही नाही.
    आवडलं :)

    ReplyDelete
  2. thanks arnikeeeeeeee !!!!!!! tu mazi pahili vachak ! :D ;)

    ReplyDelete
  3. bhakti.... sahichh lihilay....ekdum chan survat......:):)

    ReplyDelete
  4. जस चहा थंड झाला व प्यायला की विचित्र लागतो....तसच या बातम्यांचं आहे...घडतात, आपण वाचतो....त्याचं पुढे काहीच होत नाही...भिजत घोंगडं..चहा आणि बातम्यांमधला हा दुवा तु नीट साधलास...छान लिहिलय...शुभेच्छा..

    ReplyDelete
  5. thank u so much yogesh, palavi aani shrirang ! :)

    ReplyDelete
  6. ब्वॉग सुंदर आहे... सगळे लेख वाचले.. खूप छान..

    ReplyDelete